
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा ४४ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात शनिवारी (२६ एप्रिल) ईडन गार्डन्सवर होणार होता. मात्र या सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच पावसाला सुरुवात झाली.
बराच काळ पाऊस न थांबल्याने अखेर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला आहे. त्यामुळे पंजाब किंग्स ९ सामन्यांनंतर ११ गुणांवर पोहचले आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्स संघाचे ९ सामन्यांनंतर ७ गुणच आहेत.