
सलग चार सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सकडून हार पत्करावी लागली. आता हा पराभव मागे टाकून अक्षर पटेलचा दिल्लीचा संघ आज पुन्हा एकदा घरच्या मैदानावर होत असलेल्या आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सला नमवण्याचा प्रयत्न करेल.
एकीकडे दिल्लीचा संघ घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवण्यासाठी सज्ज असेल, तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा संघ सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी प्रयत्न करेल.