
सनरायझर्स हैदराबाद संघाची गेल्या दोन वर्षात जेव्हाही चर्चा झाली आहे, तेव्हा त्यांच्या स्फोटक फलंदाजीची चर्चा झाली. संघात ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेन्रिक क्लासेन असे फलंदाज आहेत, यावर्षी त्यात इशान किशनचीही भर पडली आहे.
अगदी आयपीएल २०२५ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात हैदराबादने राजस्थान रॉयल्सविरुद्ध २८६ धावा उभारल्या होत्या. दरम्यान, संघात आधीच स्टार फलंदाज असतानाही एक असा खेळाडू आहे, जो या सगळ्यांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहे. हा खेळाडू म्हणजे २३ वर्षीय अनिकेत वर्मा.
त्याने आयपीएल २०२५ मधून सनरायझर्स हैदराबादसाठी पदार्पण केले. त्याला पहिल्या सामन्यात फार संधी मिळाली नाही. पण दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध जेव्हा वरची फळी कोलमडली, त्यावेळी त्याने मात्र ५ षटकार मारत १३ चेंडूत ३६ धावांची स्फोटक फलंदाजी केली होती.