Virat Kohli: विराट अनुष्काच्या गळ्यात पडून रडला! RCB चे पहिल्या विजयानंतर जोरदार सेलिब्रेशन; Video

Virat Kohli Emotional After RCB Won IPL 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकले आहे. त्यांनी अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला पराभूत केले. या विजेतेपदानंतर विराट कोहली भावूक झालेला दिसला.
Virat Kohli | RCB
Virat Kohli | RCBSakal
Updated on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अखेर १८ वर्षांची प्रतिक्षा इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामात (IPL 2025) संपली. बंगळुरूने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवारी (३ जून) अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला अवघ्या ६ धावांनी पराभूत करत पहिल्या आयपीएल विजेतेपदाची चव चाखली.

रजत पाटिदार बंगळुरूला विजेतेपद जिंकून देणारा पहिला कर्णधार ठरला. त्याने यापूर्वीच सांगितले होते की बंगळुरू संघाला विराट कोहलीसाठी ही ट्रॉफी जिंकायची आहे.

Virat Kohli | RCB
RCB vs PBKS IPL 2025 Final: विराट कोहलीने इतिहास घडवला! 'गब्बर'चा मोठा विक्रम मोडला अन् पंजाबची वाढवली डोकेदुखी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com