
IPL Final 2025 Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Live Update: १८ वर्ष... तीनवेळा ट्रॉफीच्या जवळ पोहोचूनही अपयश आले होते.. पण, यावेळी काहीही करून आयपीएल विजयाची ट्रॉफी उंचवायची, याच निर्धाराने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ मैदानावर उतरला. घरच्या मैदानावर कमी, प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर सर्व सामने जिंकून त्यांनी इतिहासच घडवला. पण, IPL 2025 च्या ट्रॉफीत त्यांच्यासमोर पंजाब किंग्ससारखा तगडा प्रतिस्पर्धी समोर होता. सामना तसा चुरशीचा झालाही, परंतु RCB चा विजय यावेळी नशीबालाही हिरावून घेता आला नाही. विराट कोहलीचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न अखेर १८व्या पर्वात पूर्ण झाले. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB ने पहिले आयपीएल जेतेपद नावावर केले. ४ षटकांत १७ धावा देत २ विकेट्स घेणारा कृणाल पांड्या ( Krunal Pandya) खरा नायक ठरला.