Virender Sehwag has asked Vaibhav Suryavanshi to stay grounded
राजस्थान रॉयल्सचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला आणि सर्वांना चकीत केलं. आयपीएल लिलावात जेव्हा राजस्थानने या युवकासाठी कोट्यवधी रुपये मोजले, तेव्हापासून त्याची चर्चा होती. त्याला खेळण्याची संधी केव्हा मिळते, याची सर्व वाट पाहत होते. पहिल्याच सामन्यात त्याने त्याचे कौशल्य दाखवून दिले. पण, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने या खेळाडूला सल्ला दिला आहे.