IPL 2025 Gujarat Titans vs Lucknow Super Giants : मिचेल मार्शने ( MITCHELL MARSH ) सातत्य दाखवताना इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील सहावी ५०+ धावांची खेळी केली. त्याने राशीद खानच्या एका षटकात ६,४,६,४,४,१ अशा २५ धावा कुटल्या. एडन मार्करमसोबत त्याने लखनौ सुपर जायंट्ससाठी सलामीला ९१ धावांची भागीदारी केली आणि गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मिचेल मार्शने वादळी शतक झळकावताना एका वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली. २००८ मध्ये त्याचा मोठा भाऊ शॉन मार्श याने आयपीएलमध्ये शतक झळकावले होते आणि आयपीएल इतिहासात शतक झळकावणारी ही भावांची पहिलीच जोडी ठरली.