
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत नववा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात शनिवारी खेळवला जात आहे. हा सामना गुजरातच्या घरच्या मैदानावर अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात असून या सामन्यात गुजरात संघाने मुंबईसमोर १९७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
गुजराकडून साई सुदर्शनने अर्धशतक केले. तसेच उतर फलंदाजांकडूनही आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. पण शेवटी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता. शेवटच्या षटकांमध्ये सातत्याने विकेट्स गेल्याने गुजरातला २०० धावांचा टप्पा पार करता आला नाही.