

मंगळवारी (२५ मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा पाचवा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळवला जात आहे. हा सामना अहमदाबादमधील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरातसमोर २४४ धावांचे तगडे आव्हान विजयासाठी ठेवले आहे.
पंजाबसाठी श्रेयस अय्यरने पहिल्याच सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. पण त्याचे शतक थोडक्यात हुकलं. दरम्यान, पंजाब किंग्सने या सामन्यात खेळताना आपली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्याही उभारली.