IPL 2025, GT vs PBKS: सूदर्शन-बटलरची झंझावाती खेळी, पण श्रेयस अय्यरची पंजाब किंग्सच गुजरात टायटन्सवर भारी

PBKS won against GT: साई सूदर्शन आणि जॉस बटलर यांनी वादळी अर्धशतक केली, मात्र त्यांना पंजाब किंग्सविरुद्ध गुजरात टायटन्सला विजय मिळवून देता आला नाही. पंजाबसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने केलेली खेळी महत्त्वाची ठरली.
 GT vs PBKS | IPL 2025
GT vs PBKS | IPL 2025Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचा पाचवा सामनाही रोमांचक झाला. मंगळवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सला शेवटच्या षटकात ११ धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाबने विजयी सुरुवात केली आहे. श्रेयसचे पंजाबच्या विजयात मोलाचे योगदानही राहिले.

या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरातसमोर २४४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग गुजरातला २० षटकात ५ बाद २३२ धावा करता आल्या. त्यांच्याकडून साई सूदर्शन आणि जॉस बटलर यांनी चांगली झुंज दिली, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही.

 GT vs PBKS | IPL 2025
GT vs PBKS: कॅप्टन श्रेयस अय्यरचं शतक हुकलं, पंजाबच्या सर्वोच्च धावा; मॅक्सवेलने मात्र १९ व्यांदा शून्यावर आऊट होत रोहितला टाकलं मागे
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com