

इंडिनयन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शुक्रवारी (२ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना झाला. अहमदाबादला झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने ३८ धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे गुजराजने प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे. या सामन्यात बऱ्याच नाट्यमय घटनाही घडल्या.