Ashish Nehra: क्रिकेटचा की फुटबॉलचा प्रशिक्षक? गुरु नेहराजींची का होतेय चर्चा? Video Viral

Gujarat Titans Coach Ashish Nehra: गुजरात टायटन्सचा कोच आशिष नेहराचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Ashish Nehra | Gujarat Titans | IPL 2024
Ashish Nehra | Gujarat Titans | IPL 2024Sakal

Gujarat Titans Coach Ashish Nehra: इंडियन प्रीमियर लीगमधील संघांच्या प्रशिक्षकांपैकी काही प्रशिक्षक बऱ्याचदा चर्चेत असतात. त्यातीलच एक म्हणजे आशिष नेहरा. आशिष नेहरा गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यातच २०२२ पासून तो नव्याने आयपीएलमध्ये सामील झालेल्या गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आहे.

त्याच्याच मार्गदर्शनाखाली गुजरातने 2022 आणि 2023 साली अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. विशेष म्हणजे 2022 मध्ये विजेतेपदही पटकावले. दरम्यान, नेहरा ज्याप्रकारे सातत्याने सामन्यादरम्यान सक्रिय असतो, ते पाहून अनेक चाहत्यांनी त्याची तुलना मँचेस्टर सिटी फुटबॉल मॅनेजर पेप गार्डिओलाशी तुलना केली आहे.

Ashish Nehra | Gujarat Titans | IPL 2024
IPL 2024: गुजरातचा कर्णधार शुभमन गिलवर दंडात्मक कारवाई, चेन्नईविरुद्ध झालेली 'ही' चूक भोवली

खंरतर सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये प्रशिक्षक असलेला नेहरा सातत्याने त्याच्या संघातील खेळाडूंशी बोलताना दिसत आहे. तो बाउंड्री लाईनवर सातत्याने सक्रिय राहिलेलाही दिसतो.

त्याचबरोबर खेळाडूंनाही काही ना काही सल्ले देताना दिसत आहे. तो सध्याचा गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलशी बोलत आहे. त्याचबरोबर उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन आणि अझमतुल्ला ओमरझाई अशा गोलंदाजांशीही चर्चा करताना दिसत आहे.

इतकेच नाही, तर तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नसलेल्या खेळाडूंकडे मैदानात देण्यासाठी संदेशही देताना दिसत आहे. दरम्यान, नेहरा अशाचप्रकारच्या प्रशिक्षणासाठी ओळखला जातो.

साधारणत: इतर संघाचे प्रशिक्षक डगआऊटमध्ये किंवा ड्रेसिंग रुममध्ये बसलेले दिसतात. केवळ ब्रेकच्या दरम्यान, ते मैदानात आलेले दिसतात. परंतु, नेहरा मात्र सातत्याने बाउंड्री लाईनजवळ फिरताना दिसतो.

Ashish Nehra | Gujarat Titans | IPL 2024
IPL 2024, CSK vs GT: अजिंक्य रहाणेने सूर मारत पकडला मिलरचा 'किलर' झेल, Video होतोय व्हायरल

बऱ्याचदा फुटबॉलमध्ये संघांचे प्रशिक्षक असे मैदानाबाहेर थांबून संघाला मार्गदर्शन करताना दिसतात. त्यातही गार्डिओला यासाठी अधिक प्रसिद्ध आहेत. त्याचमुळे नेहराची तुलना गार्डिओलाशी होत आहे.

विशेष म्हणजे नेहराच्या प्रशिक्षणाचा गुजरात टायटन्सवर चांगला परिणामही गेल्या दोन वर्षात दिसला आहे. तसेच गुजरातच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरच्या काही षटकात नेहरा सातत्याने गोलंदाजांशी चर्चा करतानाही दिसला होता.

त्यावेळी गुजरातच्या गोलंदाजांनी अखेरच्या 4 षटकात उत्तम प्रदर्शन केले होते. त्या सामन्यात गुजरातने 6 धावांनी विजय मिळवला होता.

दरम्यान, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर साई किशोरने नेहराने ज्याप्रकारे दोन वर्ष संघाचे कल्चर तयार केले आहे, त्याचे कौतुक केले होते. त्याने सांगितले की संघाचा आता निकालापेक्षा सामन्यात चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर अधिक भर असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com