Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Marathi News: साई सुदर्शन व शुभमन गिल यांच्या दमदार सुरुवातीच्या जोरावर गुजरात टायटन्सने पॉवर प्लेमध्ये ताकद दाखवली. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांना त्यांनी हैराण करून सोडले. साई सुदर्शन बाद झाल्यानंतर आलेल्या जॉस बटलरने वादळी फटकेबाजी करून मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. शुभमन गिलनेही सलग तिसरी फिफ्टी झळकावली.