Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Marathi News: SRH चा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. GT चा कर्णधार शुभमन गिल यालाही लक्ष्याचा पाठलाग करायचा होता, परंतु नाणेफेकीचा कौल त्याच्या विरोधात गेला. गुजरातने प्लेइंग इलेव्हनमध्ये करिम जनतच्या जागी गेराल्ड कोएत्झीला संधी दिली आहे. साई सुदर्शन व शुभमन गिल यांनी गुजरातला सातत्यपूर्ण दमदार सुरुवात करून देताना पहिल्या चार षटकांत पन्नास धावा फलकावर चढवल्या. मोहम्मद शमीने टाकलेल्या तिसऱ्या षटकात साई सुदर्शनने ४,४,४,४,०,४ अशा २० धावा जोडल्या.