Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Marathi News: गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये शुक्रवारी घरच्या मैदानावर दणदणीत विजयाची नोंद केली. सनरायझर्स हैदराबादचा काटा काढून गुजरात गुणतालिकेत १४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सरस नेट रन रेटच्या जोरावर तिसऱ्या क्रमांकावर ढकलले. GT vs SRH सामना थोडा वादग्रस्त राहिला.. शुभमन गिलच्या विकेटवरून राडा झालेला दिसला... गुजरातच्या कर्णधाराने अम्पायरच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करताना दोनवेळा भांडण केले.