
मुंबई इंडियन्सने रविवारी (१३ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा धक्का दिला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने दिल्लीला १२ धावांनी पराभूत केले.
मुंबईच्या या विजयात फलंदाजांसोबतच गोलंदाजांचे मोलाचे योगदान राहिले, त्यातही कर्ण शर्माची गोलंदाजी महत्त्वाची ठरली. पण यासाठी अनेकांकडून रोहित शर्माला योगदान दिले जात आहे. कारण त्याने डगआऊटमधून दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरला होता.