Suresh Raina defends MS Dhoni passionately in a fiery live TV : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाने इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ मध्ये काल गुजरात टायटन्सला पराभूत केले. हा सामना सुरू होण्यापूर्वी एक चर्चा सुरू झाली आणि ती म्हणजे महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची... महेंद्रसिंग धोनीला सामन्यानंतर हा प्रश्न विचारला जाईल, हे माहीत होते आणि त्याने त्याचे उत्तरही दिले. पण, मागील चार वर्षांच्या तुलनेत त्याच्या उत्तरात तो आत्मविश्वास दिसला नाही. धोनीच्या निवृत्तीची चर्चा जेव्हा लाईव्ह टीव्हीवर सुरू होती, तेव्हा भारताचे माजी खेळाडू समोरासमोर आलेले दिसले.