
Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Marathi Updates: सनरायझर्स हैदराबाद संघाने इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील दुसऱ्या सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. पंजाब किंग्सने ६ बाद २४५ धावांचे लक्ष्य ठेवले आणि हैदराबादने १८.३ षटकांत २ बाद २४७ धावा करून हे लक्ष्य सहज पूर्ण केले. अभिषेक शर्माने १४१ धावांची वादळी खेळी केली, त्याला ट्रॅव्हिस हेडच्या ६६ धावांची साथ मिळाली. दोन्ही संघांच्या गोलंदाजांचा आज पालापाचोळा झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये राडा पाहायला मिळाला.