गुजरात टायटन्से इंडियन प्रीमिअऱ लीग २०२५ मध्ये बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर विजय मिळवला. RCB चा हा या पर्वातील पहिला पराभव ठऱला आहे. गुजरातने आयपीएल लिलावात सर्वाधिक १५.७५ कोटी रुपये मोजून ताफ्यात दाखल केलेल्या जॉस बटलरने या सामन्यात आक्रमक खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले. त्याने नाबाद अर्धशतक झळकावताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.