
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत बुधवारी (७ मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना होत आहे. ईडन गार्डन्सवर होत असलेल्या या सामन्यात कोलकाताने चेन्नईसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.
कोलकाताला स्पर्धेत कायम राहण्यासाठी महत्त्वाचा आहे, तर चेन्नईला १० व्या पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवायचा असेल, तर आता चेन्नईला १८० धावांचे लक्ष्य पूर्ण करावे लागले, तर कोलकाताला विजयासाठी चेन्नईला १७९ धावांच्या आत रोखावं लागेल.