
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ५७ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात बुधवारी (७ मे) खेळवला जात आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे.
चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान यापूर्वीच संपले आहे. पण कोलकाता नाईट रायडर्स मात्र प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. त्यामुळे हा सामना कोलकातासाठी करो वा मरो असा आहे. तसेच चेन्नईसाठीही १० व्या पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे.