
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ४४ वा सामना शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानात ईडन गार्डन्स येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रथम फलंदाजी घेण्याच्या निर्णयाबद्दल त्याने सांगितले की या मैदानात कोलकाताने खेळलेला शेवटचा सामना पाहिला, त्यामुळे इथे प्रथम फलंदाजी करणे फायदेशीर ठरेल, असे त्याने म्हटले. कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की आम्ही यावेळी आव्हान पार करण्याचा प्रयत्न करू.