
Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Update:
कोलकाता नाइट रायडर्सला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या आजच्या लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. KKR गुणतालिकेत सातव्या, तर RR आठव्या क्रमांकावर आहे. पण, राजस्थानला ११ सामन्यांत ८ पराभव पत्करावे लागल्याने त्यांचे आव्हान संपले आहे. कोलकाता अजूनही ४ विजय मिळवून शर्यतीत आहेत. त्यासाठी त्यांना उर्वरीत चारही सामने जिंकावे लागणार आहेत.