Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Update: ५ फलंदाज ७१ धावांवर तंबूत परतल्यानंतरही कर्णधार रियान परागने राजस्थान रॉयल्सचा संघर्ष सुरू ठेवला आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांचा समाचार घेताना त्याने सलग सहा षटकार खेचले. मोईन अलीच्या एका षटकात त्याने पाच सिक्स मारून मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. संघाला विजयासाठी १५ चेंडूंत ३४ धावा हव्या असताना रियान झेलबाद झाला. त्याने ४५ चेंडूंत ६ चौकार व ८ षटकारांसह ९५ धावांची खेळी केली.