
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावानंतर आणि युद्धजनक परिस्थिती ओढावल्यानंतर बीसीसीआयने त्वरित इंडियन प्रामियर लीग २०२५ स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित केली होती.
पण आता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली आहे. तसेच युद्धाची परिस्थिती निवळण्याचीही चिन्ह आहेत. अशात आता बीसीसीआय पुन्हा आयपीएल सुरू करण्याच्या तयारीत आहे.