
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेत काही खेळाडूंकडे अनेकांचे लक्ष आहे. यामागे कारण म्हणजे लिलावात त्यांना मिळालेली मोठी रक्कम. यातील एक खेळाडू म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत.
तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याच्यासाठी आयपीएल २०२५ लिलावात लखनौ सुपर जायंट्सने तब्बल २७ कोटी रुपये मोजले आहेत.त्याच्या बोलीने आयपीएलमध्ये एक नवा इतिहास घडवला होता.