IPL 2025 Sunrisers Hyderabad beat Lucknow Super Giants: आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू रिषभ पंतला ताफ्यात घेतल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सला खूप अपेक्षा होती. पण, संजीव गोएंका यांचे २७ कोटी पाण्यात गेल्याचे स्पष्ट झाले. रिषभचा फॉर्म चांगला राहिला नाहीच, शिवाय त्याच्या नेतृत्व कौशल्यही काही खास दिसले नाही. LSG चे आयपीएल २०२५ मधील आव्हान संपुष्टात आले. सनरायझर्स हैदराबादने २०६ धावांचे लक्ष्य सहज पार केले.