
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ३० वा सामना सोमवारी (१४ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जात आहे. हा सामना एकाना स्टेडियमवर खेळवला जात आहे.
चेन्नईने लखनौच्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या निकोलस पूरन आणि मिचेल मार्श यांच्या बॅटला शांत ठेवलं, मात्र लखनौचा कर्णधार रिषभ पंतने मात्र चांगली फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. त्यामुळे लखनौने चेन्नईसमोर १६७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.