Mumbai Indians Playoffs Qualification Scenario : मुंबई इंडियन्सने रोमहर्षक लढतीत दिल्ली कॅपिटल्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या लढतीत पराभूत केले. आयपीएलच्या या पर्वात आतापर्यंत DC हा एकमेव अपराजित संघ होता आणि आज MI ने त्यांना पराभूत केले. रोहित शर्माने डग आऊटमध्ये बसून जी सूत्र फिरवली, त्याने संपूर्ण सामन्यालाच कलाटणी मिळाली. मुंबईला अशक्य वाटणारा सामना अलगद दिल्लीच्या हातातून निसटला अन् एका नाट्यमय विजयाचे सारे साक्षीदार ठरले.