
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने अखेर दुसरा विजय मिळवला. सोमवारी (१४ एप्रिल) चेन्नईने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ५ विकेट्सने विजय मिळवला. हा सामना लखनौतील एकाना स्टेडियमवर पार पडला होता. चेन्नईचा हा ७ सामन्यातील दुसरा विजय आहे. त्यांना या विजयासाठी सलग पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, लखनौचा हा ७ सामन्यातील तिसरा पराभव आहे. तसेच सलग तीन विजय मिळवल्यानंतर त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं.