
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ३० वा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जात आहे. हा सामना लखनौच्या घरच्या मैदानात एकाना स्टेडियमवर खेळवला जात असून रिषभ पंत आणि एमएस धोनी हे कर्णधार म्हणून आमने सामने असल्याने गुरु-शिष्यामधील सामना म्हणूनही या लढतीकडे सर्वांचे लक्ष्य आहे.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.