
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत मंगळवारी (२२ एप्रिल) ४० वा सामना होणार आहे. हा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात एकाना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
या सामन्यात विजय मिळवून प्लेऑफच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.