
इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या संपूर्ण हंगामात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंत फॉर्मसाठी झगडताना दिसला. पहिल्या १३ सामन्यात त्याने फक्त एक अर्धशतक ठोकलं होतं. २७ कोटी रुपयांना खरेदी केलेल्या पंतच्या खराब फॉर्मवर बरीच टीकाही झाली.
मात्र लखनौच्या शेवटच्या सामन्यात त्याने सर्व टीकांना उत्तर देताना तो पूर्ण तंदुरुस्त असल्याचे सांगितले. रिषभ पंतने मंगळवारी लखनौच्या एकाना स्टेडियमवर खणखणीत शतक ठोकलं.
मंगळवारी एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात आयपीएल २०२५ मधील अखेरचा साखळी सामना खेळवला जात आहे.