LSG vs RCB: ड्रामा! टॉसवेळी बंगळुरूच्या कर्णधाराने सोपवली चुकीची Playing XI ची यादी; त्यानंतर काय झालं जाणून घ्या

RCB Skipper Jitesh Sharma Big Mistake during Toss: लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार जितेश शर्माकडून मोठी चूक झाली होती. त्याने संघाची चुकीची प्लेइंग इलेव्हनची यादी सामनाधिकाऱ्यांकडे सोपवली होती.
Rishabh Pant | Jitesh Sharma | LSG vs RCB | IPL 2025
Rishabh Pant | Jitesh Sharma | LSG vs RCB | IPL 2025Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत गेल्या २ वर्षापासून नाणेफेकीनंतर प्लेइंग इलेव्हनची यादी सामनाधिकाऱ्यांकडे सोपवली जाते. कारण नाणेफेकीचा निकाल काय लागतो, त्यानुसार संघ त्यांची प्लेइंग इलेव्हन आणि इम्पॅक्ट प्लेअरसाठीचे पर्याय ठरवता येतात. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रभारी कर्णधार जितेश शर्माकडून यात मोठी चूक झाल्याचे दिसले.

मंगळवारी (२७ मे) लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात एकाना स्टेडियमवर सामना होत आहे. या सामन्यापूर्वी जितेश शर्मा आणि लखनौचा कर्णधार रिषभ पंत नाणेफेकीसाठी उपस्थित होते.

Rishabh Pant | Jitesh Sharma | LSG vs RCB | IPL 2025
IPL 2025 RCB vc LSG : आयपीएलमध्ये आज अखेरचा साखळी सामना; रॉयल चॅलेंजर्स बंगळूरलाही धक्का देण्यास लखनऊचा संघ सज्ज
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com