
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ३८ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात रविवारी (२० एप्रिल) खेळला जात आहे. मुंबईच्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या दोन संघात होणारा सामना हा आयपीएलमधील एल क्लासिको समजला जातो. कारण दोन्ही संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहेत.
दरम्यान, १८ व्या हंगामात दोन्ही संघांनी चेपॉक स्टेडियमवर एकमेकांविरुद्ध खेळून मोहिमेची सुरुवात केली होती. त्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला होता. पण दोन्ही संघांसाठी यंदाचा हंगाम अद्याप तरी फारसा चांगला राहिलेला नाही.