
MI vs GT Eliminator Playing XI, Head to Head Records: मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये जबरदस्त पुनरागमन करताना प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली. गुजरात टायटन्सविरुद्ध आज त्यांना एलिमिनेटर सामना खेळावा लागणार आहे आणि या सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडू निवडताना MI ची दमछाक होणार आहे. कारण, त्यांचे तीन प्रमुख खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यासाठी माघारी परतले आहेत. त्यात आणखी दोन खेळाडू जखमी असल्याचे दिसले आहे. त्यामुळे पाच खेळाडूंनी मुंबईची डोकेदुखी वाढवली आहे.