

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील १२ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
मुंबई इंडियन्स आयपीएलच्या १८ व्या हंगामात पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळणार आहे. याआधीचे दोन्ही सामने मुंबईने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळले होते.