MS Dhoni Shares Heartwarming Moment with Rahul Dravid : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना संपल्यानंतर धोनीने थेट व्हीलचेअरवर असलेल्या राहुल द्रविड यांच्याकडे धाव घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकांनी धोनीच्या या कृतीचे कौतुक केले आहे.