
मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल पदार्पण, वानखेडे स्टेडियमवर सामना अन् ४ विकेट्स घेण्याची कामगिरी, कोणत्याही युवा खेळाडूसाठी हे एक स्वप्नासारखे असेल. पण हेच स्वप्न अश्वनी कुमारचे मात्र साकार झाले.
आयपीएल २०२५ स्पर्धेतील १२ वा सामना वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात सोमवारी (३१ मार्च) खेळवला जात आहे. या सामन्यात कोलकाताचा संघ १७ षटकांच्या आतच ११६ धावांवर सर्वबाद झाला. यात २३ वर्षीय अश्वनी कुमारचे मोठे योगदान राहिले. त्याने त्याच्या गोलंदाजीने सर्वांवरच छाप पाडली.