

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील बहुप्रतिक्षीत सामन्यांपैकी एक असलेला सामना म्हणडे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना. या सामन्याची प्रतिक्षा क्रिकेट चाहते आतुरतेने करत असतात. आयपीएलच्या १८ व्या हंगामात सोमवारी (७ एप्रिल) हा सामना खेळवला जाणार आहे. मुंबईच्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.