
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघ संघर्ष करताना दिसत आहे. पाचवेळच्या विजेत्या चेन्नईला यंदा पहिल्या ८ सामन्यांपैकी दोनच सामन्यात विजय मिळवता आला आहे.
रविवारी (२० एप्रिल) देखील चेन्नईला मुंबई इंडियन्सविरुद्ध दारूण पराभवाचा धक्का बसला. २०२२ नंतर पहिल्यांदाच मुंबईने चेन्नईला पराभूत केले. मुंबईने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर ९ विकेट्सने हा सामना जिंकला.