
सोमवारी (७ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२५ स्पर्धेत वानखेडे स्टेडियमवर १२ धावांनी पराभूत केले. मुंबई इंडियन्सचा हा यंदाच्या हंगामातील ५ सामन्यांतील हा चौथा पराभव आहे. मुंबईने सलग दुसऱ्या सामन्यात १२ धावांनी पराभव स्वीकारला आहे.
४ एप्रिल रोजी देखील मुंबईला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळताना १२ धावांनीच पराभूत व्हावं लागलं होतं. लखनौविरुद्ध तिलक वर्माला रिटायर्स आऊट करण्यावरून बरीच चर्चाही झाली होती, यावर आता मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने स्पष्टीकरण दिले आहे.