Rajasthan Royals vs Mumbai Indians Marathi Update: मुंबई इंडियन्सने सलग सहावी मॅच जिंकून इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या गुणतालिकेत १४ गुणांसह अव्वल क्रमांकावर झेप घेतली. रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर MI ने २१७ धावा उभ्या केल्या. त्यानंतर गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना स्वस्तात गुंडाळले. RR चा ११ सामन्यांतील हा आठवा पराभव ठरला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.