IPL 2025 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad: हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा घेतलेला निर्णय मुंबई इंडियन्सने योग्य ठरवला. स्फोटक खेळी करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला आज त्यांनी शांत ठेवले. पहिल्या षटकात सोडलेले दोन सोपे झेल, टिपले असते तर चित्र MI च्या दृष्टीने आणखी चांगले दिसले असते.