IPL 2025 to resume from May 16 or 17 as per Rajiv Shukla; new schedule likely to be announced soon : एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा १६ किंवा १७ मे (येत्या शुक्रवार, शनिवार) रोजी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोलकाता येथे अगोदर नियोजित असलेला अंतिम सामना मात्र अहमदाबाद येथे होऊ शकेल.
भारत-पाकिस्तान यांच्याकडून होत असलेल्या लष्करी कारवायांनंतर युद्धबंदीचा निर्णय जाहीर झाला. त्यामुळे स्थगित झालेली आयपीएल पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली वाढल्या. आयपीएल प्रशासकीय समिती आणि बीसीसीआय अधिकाऱ्यांमध्ये रविवारी बैठक झाली. यावेळी योग्य वेळापत्रक तयार करण्यात येत आहे, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली.