
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे बीसीसीआयकडून एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली. या तणावानंतर परदेशी खेळाडूंमध्येही थोडी चिंता जाणवली.
आयपीएल स्थगित झाल्यानंतर खेळाडू आपापल्या घरी परतले. अनेक परदेशी खेळाडू आणि प्रशिक्षकही आपापल्या देशात परतले आहेत. मात्र पंजाब किंग्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने हिंमत दाखवली आहे. त्याने भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.