
RR vs CSK Live Match Marathi Update: गुवाहाटीच्या मैदानावरील यंदाच्या पर्वातील आपल्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चांगला खेळ केला. पहिल्या षटकात विकेट गमावूनही नितीश राणा व संजू सॅमसन यांच्या ८२ धावांच्या भागीदारीने चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी वाढवली. पण, नितीशच्या विकेटनंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. मथिशा पथिराणा व विजय शंकर यांनी घेतलेले अफलातून झेल, चर्चेच राहिले. या सामन्यात RR सह राणा व रियान यांच्या R ची चर्चा राहिली आणि ही मॅच खऱ्या अर्थाने 'RRR' ठरली.