
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला शनिवारपासून (२२ मार्च) सुरुवात होत आहे. पहिला सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमध्ये गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होणार आहे. या सामन्यापूर्वी आयपीएलच्या या १८ व्या हंगामाचा चमकदार उद्घाटन सोहळा पार पडला.
नेहमीप्रमाणे या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रेटीची उपस्थिती होती. त्यांचा चमकदार परफॉर्मन्सही स्टेडियममधील प्रेक्षकांसह टीव्ही आणि ओटीटीवर पाहाणाऱ्या चाहत्यांनाही पाहायला मिळालाय.