IPL 2025 Orange Cap latest standings : आयपीएलमध्ये आतापर्यंत फलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. प्रत्येक संघाच्या फलंदाजांनी विरुद्ध संघाच्या गोलदांजांची यथेच्छ धुलाई केली आहे. यात विराट कोहली आणि साई सुदर्शन आघाडीवर आहेत. दोघेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून जोरदार फटकेबाजी करत आहेत. त्यामुळे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दोघांमध्ये रस्सीखेच बघायला मिळते आहे.