
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेतील ५८ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळवला जात आहे. हा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.
हा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफसाठी प्रबळ दावेदारी ठोकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पंजाब सध्या पहिल्या चार संघात आहे, पण सुरुवात दमदार केलेल्या दिल्लीला पहिल्या ४ संघातून बाहेर व्हावे लागले आहे. त्यामुळे पुन्हा पहिल्या ४ मध्ये येण्यासाठी त्यांना विजयाची अपेक्षा आहे.
हा सामना जिंकला तर पंजाब किंग्स प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ ठरेल. असं झालं, तर तब्बल ११ वर्षांनी पंजाब प्लेऑफमध्ये खेळेल.